पान:महाबळेश्वर.djvu/334

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



म्युनिसिपालिटी.
----------------------

 मालकमपेठची वसाहत इ० स० १८२७ पासून सुरू झाली, हें पूर्वी मालकम पेठ ऊर्फ नहर या प्रकरणांत सांगितलेंच आहे. तेव्हांपासून इ० स० १८६६ पर्यंत या हिल्लस्टेशनची स्वच्छतेसंबंधी व्यवस्था पाहण्याचें काम सरकारतर्फे नेमलेल्या कांहीं मंडळीकडे होतें. यास हे काम करून घेण्यास जो खर्च करावा लागे, तो सरकारी खजिन्यांतून कांहीं एक ठराविक रकम घेऊन त्यांतून करण्याची या मंडळीस परवानगी होती. या रकमेस " स्टेशनफंड ” अशी संज्ञा असे. पुढे इ० स० १८६५ मध्यें या स्टेशनची सुधारणा करण्याचें सरकारचे मनांत आल्यावर त्यांनीं या साठीं ज्यास्त लागणाच्या पैशाची जुळणी करण्याकरितां ही म्युनिसिपालिटी स्थापन करण्याची कल्पना काढली. त्याप्रमाणे इ० स० १८६७ तारीख १ माहे मे इसवी रोजी ही मंडळी कमी करून सरकारानें गांवम्युनिसिपालिटीची स्था-