पान:महाबळेश्वर.djvu/333

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९८ )

 आहे. पुढें डोंगराच्या बाजूकडे जरा वळलें असतां ही घळ दिसू लागते. तिची आंतून लांबी ५० हात, रुंदी २० हात व उंची १० हात आहे. तोंडाची रुंदी सुमारें १६ हात असून उंची १० हात आहे. ह्या घळीच्यावरून पाण्याचा प्रवाह बारा महिने पुढें पडून वाहत असतो. यावरून यांत मनुष्यवस्ति असावी असें अनुमान होतें. ही घळ सरकारी जंगलाच्या हद्दीत आहे. तथापि या ठिकाणीं मनुष्यांची व जनावरांची वर्दळ असल्यामुळे आंत जाऊन पाहण्याची धास्ती वाटत नाहीं. याजबद्दल जवळपासच्या गांवकरी लोकांची अशी कल्पना आहे कीं वाघ वगैरेच्या धाडी पडण्याची काळजी असल्यामुळें गुरें बंदोबस्तानें ठेवण्याकरितां ही घळ कोरली असावी. हल्ली ५०|६० गुरें मावण्यासारखी विस्तीर्ण जागा यांत असून ती स्वच्छ आहे.


--------------