पान:महाबळेश्वर.djvu/332

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९७ )

 थ्याच्या भागाचा उंच मान काढून उभा राहिलेला खडक सर्व ठिकाणीं उघडा व काळाभोर दिसून जवळ असल्यामुळे पाहणाराच्या मनास गर्भगळित करून टाकतो. डावे अंगास तळांतील सपाट जाग्यावर चिमुकले धनगरी पद्धतीचें कमलजा देवीचें देवालय व त्याच्यापुढील पटांगणास लागून वाहत असलेला वेदगंगेचा प्रवाह हीं त्या हिरव्यागार पसरलेल्या सृष्ट गालिच्यास चित्रविचित्र प्रकारची शोभा देतात, असें सुमारे तीन मैल डोंगर उतरून गेलें हमणजे जोरगांव लागते. ह्या गांवास सपाटीची जागा नसल्यामळे गावांतील केंबळी घरांची त्रेधा उडल्यासारखी दिसते. कोठें दोन, कोठें चार, अशीं जागजागीं खोपटीं केलेलीं दिसतात, यावरून देशावरील मनुष्यास हें गांव आहे किंवा सोंग आहे असें वाटल्यावांचून राहत नाहीं. पुढे डावेबाजूनें निघून चाललें ह्मणजे कृष्णानदीचें झुळझुळ वाहत चालणाऱ्या प्रवाहाचें लहान ओढयासारखे पात्र लागतें, तें आणि वेदगंगेचा मोठा प्रवाह यांचे येथें ऐक्य होऊन कृष्णाबाईचें मोठे प्रस्थ झालें