पान:महाबळेश्वर.djvu/331

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९६ )



गायदरा किंवा गुलेरा घळ.

 ही घळ पांचमैलाच्या हद्दीतील गोळेगांवचे रानांत जोर व गोळेगांव या गांवांच्या दरम्यानचे टापूच्या डोंगरांत सपाटीवर आहे. या ठिकाणी येण्यास वाट मालकंपेठेपासून महाबळेश्वरक्षेत्रपावेतों उत्तम गाडी रस्त्याची असून पुढें मात्र पायानें गेलें पाहिजे. ही पायवाट महाबळेश्वरीं गणेशदाऱ्यानें फुटते. ही मातट जमीनीची लहान पाउलवाट असून तिच्या दुतर्फा दाट झाडीची थाप लागून गेलेली आहे. त्यामुळे पादचारी लोकांना या वाटेनें त्या झाडाची थंडगार हवा लागून येतां जातां घामानें अंगावरची पैरण भिजून चिप होण्याची वेळ येत नाहीं. तळातील जोरगांवचे लोक या वाटेनें डोकीवरून मोठमोठाले भारे वगैरे आणून मालकमपेठेत विकून टाकितात व लागलींच संध्याकाळी परत घरीं जातात. खाली उतरून जाताना डावीकडे व उजवीकडे डोंगराच्या बाजवा दाट झाडीने आच्छादित झाल्यामुळे चोहोंकडे जमिनीचा किंवा पाषाणाचा यत्किंचित भाससुद्धा होत नाहीं. परंतु मा-