पान:महाबळेश्वर.djvu/330

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९५ )

 जाण्यासारखी आहे. या वाटेनें सुमार ४ मैल गेलें, म्हणजे एक गुहा डोंगराच्या मध्यभागीं मुद्दाम कोरल्याप्रमाणें दिसते. ही गुहा कोणी कोरली असावी हें समजत नाहीं.या गुहेला बाहेरील बाजूस व्हरांडयासारखी जागा असून त्यांत चौकोनी पाण्याचे दोन हौद बांधलेले आहेत. यांतील पाणी जिवंत असून नेहमीं भरलेलें असतें. हें पाणी क्षेत्र महाबळेश्वरचे पाण्याप्रमाणें गोड व थंडगार असते. पलीकडे देवळांतील गाभाऱ्याप्रमाणें एक अंधाराची सुमारे २० फूट लांबीची कोरीव घळ आहे, त्यांत खडबडीत पाषाणाची २ फूट उंचीची मूर्ति आहे. तीस कार्तिकस्वामी, असें ह्मणतात. हिंदु धर्माप्रमाणें फक्त पुरूष मंडळी याची पूजा करण्यास जाते बायका या देवास कधींही जात नाहींत. जत्रा कार्तिकी पौर्णिमेस भरते, त्या वेळीं येथें जवळपासचे पुष्कळ लोक जमतात हें कोरीव काम फार पैस असून मजबूत आहे. याची आजपावेतों कोणीही दुरुस्ती केली नाहीं तथापि अद्याप पावेतों ते कोठेहीं भंगलेले किंवा पडलेले दिसत नाहीं.