पान:महाबळेश्वर.djvu/329

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९४ )

 त्याला जाण्यास रस्ता पांचगणीपर्यंत, उत्तम गाडीचा आहे. तेथून तायघाटानें खालीं उतरून धौम अबेपुरीवरून पाऊलवाट गेलेली आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंत दीड मैल चढून जावें लागतें. हा किल्ला चोहोबाजूंनीं चांगला बांधलेला आहे. याची उंची ४१७७ फूट आहे. येथून फार लांबीचा प्रदेश दिसतो. या किल्ल्यावर पाणी फार चांगलें आहे. येथेंच पांडव पूर्वी अज्ञातवासांत असतांना येऊन छपून राहिले होते अशी आख्यायिका आहे. कारण डोंगराचे माथ्यावरून जमीन पोंखरून तळापर्यंत वाट केलेली तीन चार जागीं आहे तीस पांडवदरा असें म्हणतात. हल्लीं हा आंतून पडल्यामुळे बुजून गेला आहे. पांडवाच्या मूर्तीही वर आहेत. त्यांस पांडवजाईचें देऊळ म्हणतात. येथें वार्षिक जत्रा भरत असतें. ह्या डोंगरांत तीन पाण्याचें हौद व एक गुहा आहे.

राजपुरी

पांचगणी गांवचे मागील बाजूस खिंडीतून राजपुरी येथें येण्यास वाट आहे. ही वाट फक्त पायाने