पान:महाबळेश्वर.djvu/328

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९३ )

 पाईंंटापासून सुमारें ६ मैल आहे. याला जाण्यास पाऊलवाटच आहे, पण चांगली आहे. या गांवचे आसपास फार किर्र झाडी आहे. त्यांत डुकरें, भेकरें, ससे, सांबरे, पांखरें वगैरे पुष्कळ प्राणी आहेत. या गांवाच्यापलीकडे सुमारें १०|१२ मैलांवर बामणोली गांव आहे त्याचे जंगलांत अस्वले, सांबर हीं जनावरें आहेत. बामणोलीला जाण्यास मेढें गांवावरून चांगली पाऊलवाट आहे. हीं ठिकाणें शिकारी लोकांना रंजविण्यासारखीं आहेत व यांवर मैदानांतील हौसी लोकांना झाडीची मजा पाहण्यासारखीं आहेत.

चंद्रगड

प्रतापगडच्याच दिशेकडे मालकमपेठेपासून सुमारें ६ मैलांवर आर्थरसीटचे बाजूस भैरव दऱ्यानें ढवळ्या घाटालगत एक टेंकडी आहे तिला चंद्रगड असें ह्मणतात. या गडाचे भोंवतालच्या जंगलांत मोठ मोठे हिंसक पशू आहेत. त्यांची पारध करण्यास येथून लोक कधीं कधीं जातात.

पांडवगड.

कमलगडाच्या पलीकडे ५ मैलांवर पांडवगड आहे.