पान:महाबळेश्वर.djvu/327

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९२ )

 सारखा बोगदाच होता अंसें सांगतात. हल्लीं ही येथील कहरी पावसाच्या पाण्याचे लोंढयांनीं आंत गाळ येऊन भरत चालली आहे असें दिसतें. या घळीच्या आसपास झाडी गर्द असून त्यांत हिंसक जनावरांची जाग ( चाहूल ) आहे. तेव्हां तीं या घळींत जाऊन स्वस्थ पडत असण्याचा बराच संभव आहे. यामुळे जवळपासच्या खेड्यांतील लोक आंत जाण्यास फारसे धजत नाहींत. या घळीला येथील लोक शिन शिन घळ किंवा भयंकर रस्ता असें म्हणतात.

दुतोंडी घळ.

ही घळ सिंडोला डोगराची ओळ व पांचगणी रस्ता यांपासून जेथें केट पांइटला जाण्याचा रस्ता फुटतो त्यांचे दरम्यानचे सखल जागेंत केलेली आहे. ही वर सांगितले घळीपेक्षां लहान आहे, तथापि ही फार प्रसिद्ध आहे आणि पुष्कळ लोक ही पाहाण्यास येतात.

पारूत.

दक्षिणेस कोयना खो-याच्या बाजूस या डोंगराच्या शैलबाहुवर हें एक खेडें आहे. हें बाबिंगटन