पान:महाबळेश्वर.djvu/326

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९१ )


आहेत, परंतु याबद्दलची निश्चयात्मक माहिती मिळत नाहीं, कांहीं लोकांचें असें म्हणणें आहे कीं पूर्वी येथें अरण्यांत राक्षस राहत होते, त्यांचें हें वसतिस्थान असावें; कांहींचें असें म्हणणें आहे कीं, ऋषींनीं तपश्चर्या करण्याकरितां अशा एकांत जागीं गुहा केली असावी; कांहीं आधुनिक मंडळीचें असें मत झालें आहे कीं, पूर्वी येथील धावड लोकांचा लोखंड काढण्याचा कारखाना होता त्या वेळीं त्यांनीं येथून दगड नेऊन नेऊन ही जागा खोदून टाकिली असावी. परंतु या शेवटच्या कल्पनेवर अशी शंका उत्पन्न होते कीं, लोखंडी दगड येथील जमीनीचे पृष्ठभागावरच जर हवा तितका सांपडतो तर जमीनीचे आंत खोदून दगड काढण्याचें त्यांस काय प्रयोजन होते?

 ही घळ आंत सुमारें १५० फूट लांब आहे. घळीचें तोंड १० फूट रुंद असून न ओणवतां आंत जाण्यासारखे उंच आहे. मध्यभागाची जमीन सखल होत आली आहे. कांहीं वर्षांपूर्वी ही घळ म्हणजे एक ५०० फूट लांबीचा आरपार जाण्या-