पान:महाबळेश्वर.djvu/325

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९० )

 या टेंकडीवर मुळींच वस्ती नाहीं. या गडाच्या दोहों अंगास लहान झुडपांची पुष्कळ दाट झाडी आहे. भोवतालच्या खडकाचे पायथ्याजवळ पाण्याचा झरा आहे व त्याचे पश्चिमेस गोरखनाथाचें एक ओबडधोबड देऊळ आहे. हा डोंगर हल्लीं अजगांवाखालीं आहे. यावर एप्रिल व मे महिन्यांत डुकरांचा बराच प्रळय होतो. त्या वेळीं त्यांची पारध करण्याची फार मौज असते.

चोरांची घळ.

मालकमपेठेपासून सुमारें ५ मैलांवर दक्षिण अंगास एक घळ आहे ती पाहण्यास बरेच लोक जात असतात. तिकडे जाण्यास बाबिंगटन पॉईंट पासून पुढें वाट फुटलेली आहे. हा फुटवाट एक मैलपर्यंत गाडी किंवा घोडे जाणेसारखी आहे. नंतर पायानें जाण्याची पाऊलवाट लागते. ती एका खडकाळ मैदानांत गेली आहे. ह्या मैदानाचे एका बाजूस ही घळ आहे. मालुसरे गांवच्या धावड लोकांची या पाउलवाटेनें फार रहदारी असते. या घळीसंबंधानें लोकांनीं निरनिराळी अनुमाने केलीं