पान:महाबळेश्वर.djvu/324

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८९ )

 लून खडक आहे, त्यांतून आंत जाण्यास कोठे वाट नसल्यामुळे वरून चढून जाण्यास फार आयास होतात. पूर्वी खडकाच्या तळांतून वर जाण्यास एक भुयार असे, त्यांतून लोक येत जात असत. अलीकडे या भुयारांत एक मोठा थोरला दगड कोसळून पडल्यामुळे भुयारांत जाण्याची अगदींच बंदी झाली आहे. त्याच दगडाजवळ पायराच्या झाडावरून लोक वर जात येत असतात. येथे कोणी इमारती किंवा तट बांधिल्याचीं कांहींच चिन्हें दिसत नाहींत. येथे एक खोल विहीर आहे ती सर्व कावेच्या दगडांची असून नेहमीं पाण्यानें गच्च भरलेली असते. हल्लीं इची खोली सुमारे ३० पासून ३५ फुटांपावेतों आहे. या विहिरींत कोनाडे होते. आरोपी लोकांना उपाशी ठेविले असतां लवकर जीव देणें बरें किंवा उपासमार होत होत मरणें बरें वाटतें, हें पाहण्याकरितां ही कोनाडयांची तजवीज केली होती असें ह्मणतात. परंतु हे कोनाडे कोठे आहेत तें आतां विहीर बुजत आल्यामुळे दिसत नाहींसें झालें आहे.