नाहीं. पूर्वबाजूच्या शिखराचे पायथ्याशी घोणसपूर ह्मणून गांव आहे. तेथून वर गेलें ह्मणजे तेथील देखावा पाहून मनास मोठा विस्मय वाटतो. त्याचप्रमाणें चोहों बाजूला तट पडित झालेला पाहून आर्यमातेच्या मुलांनीं आपल्या कर्तबगारीच्या दिवसांत अशा दुर्घट स्थळीं हा तट कसा बांधला असेल, याचें सानंद आश्चर्य वाटतें व आतां असा त्याचा त्राता कोणी राहिला नसल्यामुळे तो उध्वस्त झालेला पाहून मागल्या अमदानीची आठवण होऊन मन उद्विग्न होतें. तेथील मल्लिकार्जुनाचें देऊळाची व्यवस्था आतां कोणी मुळींच पहात नाहीं यामुळे आकाशांतील सृष्टिक्रमाप्रमाणें तें पंचतत्वाला मिळत असलेले पाहून पूज्यबुद्धि वाटून मनाची व्यग्रता होतें. याच किल्ल्यावर पेशव्यांचे कारकिर्दीत पूर्वी ज्या ताई तेलिणीनें पुष्कळ दिवस टिकाव धरून बापू गोखल्यासारख्या शूर सरदारास दाद लागू दिली नाहीं तिनें खोदून काढलेले एक पाण्याचें तळघर फार आरामदायक आहे. त्यामध्यें खोदलेली जागा सुमारें आठ खणी दुजोडी सोप्याइतकी पैस असून मधून मधून
पान:महाबळेश्वर.djvu/321
Appearance