रून “ सॅॅडल बॅक ” असें नांव प्राप्त झालें आहे. याला उंटावर घालण्याच्या खोगिराचा आकार आला आहे. तो फार चमत्कारिक दिसतो. याच खुणेवरून अपरिचित मनुष्याला या शैलसमुदायामध्ये त्याची ओळख करून देतां येतें. सासून व बाबिंगटन पाईंटापासून हा उत्तम दिसतो. याच्या अगदीं शिखरावर जाण्यास १० किवा १२ मैल चालून जावें लागतें. या किल्ल्यावर जाण्यास बाबिंगटन पाईंटाच्या पलीकडून एक पाऊलवाट आहे ती मांघर, चतुरबेट गांवांवरून इकडे घोणसपूर गांवावर गेली आहे, व ही फारशी त्रासदायकही नाहीं. या डोगराला जी दोन पूर्वपश्चिम शिखरे आहेत, त्यांपैकीं पूर्वेकडील बाजूचे शिखराची वाट सोपी आहे व त्या शिखरावर जाण्याची तसदी घेतली, तर कांहीं सृष्टिचमत्कार पाहून सार्थक होण्यासारखे आहे. परंतु वाट अरुंद असून दोन्ही बाजूला कडे तुटलेले असल्यामुळे वर जाईपर्यंत जिवांत जीव असत नाही. पश्चिम बाजूच्या शिखराची वाट फारच खडतर अमून वर कांहीं रमणीय देखावाही
पान:महाबळेश्वर.djvu/320
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८५ )