Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/322

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८७ )

 खांब खोदलेले दिसतात. यांत नेहमीं जिवंत पाणी भिंगासारखें स्वच्छ भरलेलें असतें. वर जाऊन हे पाणी प्याले हमणजे पूर्ण श्रमपरिहार झाल्यासारखें वाटतें. ज्यांनीं पुण्याचे गाडीरस्त्यावरील खंडाळ्याच्या घाटांतला खांबटकीचा तलाव पाहिला असेल, त्यांस या तळघराची प्रतिमा जलद डोळ्यापुढें येईल. हा डोंगरमाथा प्रतापगडापेक्षांही जास्त उंच असल्यामुळे चोहीकडे फार अफाट प्रदेश दिसतो, आणि आकाश निरभ्र असल्यास बऱ्याच लांबीचा कोंकणप्रदेश व समुद्रावरून बदकाप्रमाणें चाललेल्या आगबोटी पाहून मजा वाटते. असा सर्वत्र भव्य देखावा पाहून आपल्या सूक्ष्मपणाविषयीं विचार मनांत येऊन आपले मन अगदीं खट्टू होऊन जातें.

कमलगड.

 कमलगड हाही बांधिव किल्लाच आहे. या किल्यावर चोहोबाजूला तटासारखा खडक आहे. तेथें विजापुरच्या बादशहाचे पदरचे चंद्रराव मोरे ह्मणून कोणी जावलीचे राजे जाऊन येऊन असत. या मोऱ्यांच्या सात पिढ्या पावेतों त्यांचें राज्य चाललें होतें,