पान:महाबळेश्वर.djvu/319

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८४ )

   परित्राणाय साधूनां । विनाशायच दुष्कृतां ॥
  धर्मसंस्थापनार्थाय ॥ संभवामि
  युगे युगे ॥ १ ॥

मकरंदगड.

 मकरंदगड यास येथील लोक घोणसपूर असें म्हणतात. हाही प्रतापगडाप्रमाणेंच डोंगरी किल्ला आहे. परंतु यावर प्रतापगडाप्रमाणें एकादें युद्ध झाले असतें तर त्यांचें नांव इतिहासांत प्रतापगडाप्रमाणें अमर होऊन राहिले असतें. तथापि याचा उपयोग जरी प्रत्यक्ष रीतीनें स्वदेशसेवा करण्यास झाला नसला, तरी हा आड बाजूला असल्यामुळे शत्रूचा घाला आला असता छपून बचाव करण्यास किंवा वासोटा वगैरे किल्यावर जाण्यायेण्यास ह्यानें अनेक वेळां चांगली मदत दिली. सन १६५६ मध्यें जेव्हां प्रतापगड बांधिला त्याच वेळीं शिवाजी महाराजांनीं याचीही दुरुस्ती करून घेतली. याची उंची ४०५४ फूट आहे. याचें पठार उंच सखल आहे.

 हा किल्ला मालकमपेठेपासून दक्षिण दिशेस ७ मैल अंतरावर आहे, याला त्याच्या बाह्यस्वरूपाव-