लिहिलें होतें त्यांत "छत्रपती " हें विशेषण स्पष्टपणें दिलेलें आहे, तें असें:--
शिवनाम तुझें । ठेविलें पवित्र । छत्रपति सूत्र ।
विश्वाचें कीं ॥ १ ॥
यावरून छत्रपति हे नांव प्रतापगडच्या लढाईचे वेळीं व त्यापूर्वी सर्व लोकांत प्रसिद्ध होतें. पुढे महाराजांनीं गुरूपदेशाप्रमाणें हिंदुधर्माचे व गोब्राम्हणाचें रक्षण केलें. हल्ली याच महाराजांच्या घराण्याची शाखा कोल्हापुरास आहे व तेथील गादीला पूर्वी ईश्वरी प्रसादानें मिळालेली “ छत्रपति ” ही पदवी अद्यापि चालत आहे. शिवाजी महाराजांच्याच उपदेशाची स्मृति चोहीकडे राहून त्यांच्या राज्याच्या सर्व शाखा अशाच चिरकाल आणि निर्विघ्नपणे चालेीत, अशी परमेश्वरास आमची प्रार्थना आहे. असे रामदासस्वामींसारखे अवतारी पुरुष धर्माची निकृष्ठावस्था होत चालली म्हणजे परमेश्वरी अंशरूपाने जगांत निर्माण होतात, हें गीतेंतील कृष्णाच्या वाक्यावरून सिद्ध होते:-