पान:महाबळेश्वर.djvu/317

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८२ )


  कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांस धाक सुटला ।
  कित्येकांस आश्रय झाला । शिवकल्याण राजा ॥ १२ ॥
  तुमचे देशीं वास्तव्य केलें। परंतु वर्तमान नाहीं घेतलें।
  ऋणानुबंधें विस्मरण झालें । बा काय नेणूं ॥ १३ ॥
  सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणें काय तुह्माप्रती ।
  धर्मस्थापनेची कीर्ति । संभाळिली पाहिजे ॥ १४ ॥
  उदंड राजकारण तटलें । तेथें चित्त विभागलें ।
  प्रसंग नसतां लिहिलें । क्षमा केली पाहिजे ॥ १५ ॥

  हें वाचून शिवाजीनें उत्तर लिहिलें कों आशीर्वादपत्र पाहून परमानंदातें पावलों. दर्शनाची इच्छा धरून येत आहें. शेवटीं हें पत्र व आपण स्वत: स्वामिस एकाचवेळीं प्रास झाल्यावर स्वामींनीं त्यांस एक नारळ प्रसाद दिला आणि मूठभर खडे, मूठभर माती व मूठभर लीद दिली. त्याचा अर्थ-नारळ स्वकल्याणार्थ; माती दिली त्याचा अर्थ पृथ्वी प्राप्त होईल; खडे दिले त्यावरून किल्ले ताब्यांत राहतील; लीद दिली याचा अर्थ पागा ताब्यांत राहील. तसेंच सन १६५९ पूर्वी तुकारामबोवांनीं शिवाजीस पत्र