पान:महाबळेश्वर.djvu/314

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७९ )

 प्रतापगडावरच त्या देवीचें नांवानें एक देवी करून बसविली. असें करण्यास त्यांस तुळजापुरचे देवीचा दृष्टांत झाला होता.

 महाराज रायगडीं असतां त्यांनीं कीर्तनांत गोसाव्याचे तोंडून सद्गुरूवांचून मोक्ष नाहीं असें ऐकिल्यावर त्यांना मोठा विचार पडला. तेव्हां ते आपली कुलस्वामिनी जी भवानी इची प्रार्थना करण्याकरितां प्रतापगडीं आले, आणि गुरु कोणास करावें याविविषयीं आज्ञा व्हावी ह्मणून त्यांनीं देवीची आराधना केली, तेव्हां देवीनें सांगितले कों, "रामदासस्वामी यांसच शरण जावें, कारण ते तुम्हांकरितांच उत्पन्न झाले आहेत. ” हा दृष्टांत झाल्यावर महाराज स्वामींच्या दर्शनाकरितां चाफळास आले. स्वामी तेथे नव्हते ह्मणून स्वामींचा शोध करीत महाराज बरेंच फिरले, परंतु शोध न लागल्यामुळे प्रतापगडीं राज्यकारणामुळे निघून आले. आणि पुन: देवीची प्रार्थांना केली कीं प्रयत्न केला असतांही दर्शन होत नाहीं याचें कारण काय? त्याच दिवशीं रात्रींं स्वप्नामध्येंं--पायीं पादुका, कटीं