पान:महाबळेश्वर.djvu/313

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७८ )


पाठविलें. तो पूर्वी वांईस सुभेदारीचे कामावर असल्यामुळे वाईस येऊन राहिला. हें शिवाजीस कळतांच तो प्रतापगडावर येऊन दाखल झाला आणि सन १६५९ सालीं पूर्वी सांगितल्याप्रमाणें प्रतापगडच्या लढाईत त्याचा त्यानें पराजय केला. नंतर त्यावर्षी ( १६५९ त ) पावनगड व पन्हाळा हे विजापूरबादशहाचे किल्ले घेतले. हे किल्ले जवळ जवळ आहेत. ह्याच सालीं घोसाळ्याजवळचा बिरवाडीचा किल्ला प्रतापगडच्या लढाईनंतर बांधिला. सन १६६० मध्यें विजापूरच्या बादशाहांनीं पुन्हां शिद्दीजोहार यास महाराजांवर पाठविलें, तेव्हां महाराज पन्हाळ्यावर हेोते. शिद्दी जोहारानें तेथें पुष्कळ दिवस तळ देऊन वेढा दिला होता. शेवटीं महाराज रांगण्यावर गेले व शिद्दीजोहार याचे हातीं पन्हाळा लागू दिला नाहीं. पन्हाळा व पावनगड हे मजबूतीविषयीं फार प्रसिद्ध होते, असें महाराजांचे पवाडयावरून समजतें. असा महाराजांचा राज्य विस्तार वाढत चालल्यामुळे तुळजापूरचे कुलस्वामिनी देवीस जाण्यास फुरसत होईना म्हणून त्यांनी