पान:महाबळेश्वर.djvu/312

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७७ )

 अव्याहत चालले होतें. पुढें याजपासून शिवाजी महाराजांनीं घांटमाथा काबीज केला. यावेळींं महाराज हमेशा महाडास राहत असत व सह्याद्रिमार्गाने त्यांचें घाटांवर येणेंजाणें असें. पुढें महाराजांनीं वासोटा किल्ला सर केला, तेणेंकरून संपूर्ण जावली सस्थान त्यांचे स्वाधीन झालें; तेव्हां सन १६५६ मध्यें महाराजांनीं विजापुरवाल्याचा सरदार मोरे याचा वाडा पाडून त्याचीं लांकडे व दगड प्रतापगडचे कामास आणून गडाचें काम केलें, आणि हें जावली प्रांताचें सदर ठिकाण करून टाकिलें. याचे पूर्वी इ० स० १६४७ मध्यें राजगड किल्ला महाराजांनीं तोरण्याजवळ मोरबद या नांवचे टेकडीवर बांधिला. बाणकोट किंवा मंडणगड-रगतगड व रोहिला हेही पूर्वीच बांधिले होते. हे किल्ले कोंकणांत आहेत.

 विजापूरच्या बादशाहानीं शिवाजीस पुष्कळ वेळांं धमकी देऊन पाहिली व लालुचही दाखविली. परंतु सर्व प्रयत्न पाण्यांत गेले असें पाहून आफजुलखानास सैन्यासह महाराजांवर