पान:महाबळेश्वर.djvu/311

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७६ )

 स्नेहाळु जननीस अपत्यकलेवर सोडवत नाहीं त्याप्रमाणें सहदय महाराष्ट्रीयांस याचे जवळ आल्यावर एकवार तरी प्रेमपूर्वक त्याचें दर्शन घेतल्यावांचून रहावत नाहीं, हें अगदीं उचित आहे.

 यावेळीं शिवाजीचा उत्कर्ष कसकसा होत गेला व त्याची स्वधर्मावर असलेली निःसीम श्रद्धा कशी त्यास फळास आली याबद्दलची हकीकत फार रसाळ आणि श्रवणीय असल्यामुळे थोडक्यांत येथें देतों:-

 शिवाजीचा इतिहास   जावली प्रांतांत शिरके मराठे युांस विजापूर बादशहाचे तर्फेने राज्यव्यवस्था पाहण्याकरितां नेमलें होतें. परंतु हे त्यांस बिलकुल जुमानीत नसत. कारण सह्याद्रीचे पहाडामध्यें बादशाहाचे फौजेचा बिलकुल इलाज चालत नसे. आणि ह्मणूनच प्रतापगडच्या लढाईतसुद्धां आफजुलखान वांईस तळ देऊन बसला होता. पुढें कालगतीचे योगानें शिरक्याचा लय होऊन, त्यांचा मुलूख चंद्रराव मोरे यास इनाम मिळाला. त्यांचे राज्य सन १६५५ पर्यंत