पान:महाबळेश्वर.djvu/310

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७५ )


 स्काट वारिंगचे इतिहासांतही अशीच हकीकत आहे. असें झाल्यावर त्याचें डोकें कापून किल्यावर पुरून त्यावर कबर बांधिली आणि धड किल्याखालीं पुरलें. त्यावरही अद्यापि कबर आहे. नंतर त्यांच्या सैन्याची कत्तल करून सर्व सामुग्री लुटून आणिली. इ० स ० १६५९ साली महाराजांनीं अशी तरवार बाहदरी केल्यावर त्यांची फार कीर्ति झाली यावेळीं शिवाजीचें वय सुमारे ३२ वर्षांचें होतें. या ऐतिहासिक प्रसंगामुळेच प्रतापगड हें स्थळ इतिहासांत फार प्रसिद्धीस आलें. या प्रसंगापासूनच मोंंगलांवर मराठयांचे वर्चस्वाची सुरुवात झाली. पुढे पेशवाईत सन १७७८ मध्यें याच गडावर नानाफडनविस यांनीं सखारामबापु बोकील यांस कैदेंत ठेविलें होते. असेा. हा किल्ला शिवाजीमहाराजांस यशस्वी झाला व त्यांच्या दौलतीचा मूळखांब बनला. त्यामुळे त्याबद्दलचा मोठा अभिमान सर्व मराठयांस वाटणें साहजिक आहे. परंतु आतां जरी वैभवालंकार जाऊन नुसतें कलेवर राहिलें आहे तथापि प्राणोत्क्रमण झालें असतांही ज्याप्रमाणें