पान:महाबळेश्वर.djvu/309

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७४ )


येथून ४ मैल आहे) भेटीची वेळ येतांच पहिल्यानें आफजुलखानानें एका हातानें शिवाजीस गच्च धरून वार केल्यावर शिवाजीनें खानाच्या पोटांत वाघनखें खुपसलीं आणि त्याचीं आंतडींं बाहेर काढली, त्यासरसा खानाला त्वेष येऊन त्यानें शिवाजीचें डोक्यावर वार केला, तेव्हां शिवाजीनें बिचवा काढून त्याचा प्राण घेतला. खानाच्याबरोबर असलेल्या हत्यारबंद शिपायाला तानाजी मालुसऱ्याने ठार केलें. यांत शिवाजी महाराजांनी दगलबाजपणा केला नाहीं. अशी माहिती जुने पवाडयावरून मिळते तो असाः--

 ॥ अबदुल्यानें कव घातली ॥

 ॥ शिवाजी गवसून धरला सारा ॥

 ॥ चालवी कटारीचा मारा ॥

 ॥ शिल्यावरी न चले जरा ॥

 ॥ राजाने बिचवा लावून दिला ॥

 ॥ वाघपंज्याचा केला मारा ॥

 ॥ त्याचे फोडिलें उदरा ॥