पान:महाबळेश्वर.djvu/308

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७३ )

 आपला हेतू सफल होण्याची संधि तो पहातच होता. अफजुलखान गर्विष्ट असल्यामुळे फार चढून गेला आणि त्यास अंतर्यामीं फार आनंदही झाला कीं, आपण आलों असें ऐकतांच शिवाजी इतका वंगला. त्या गुर्मीतच शिवाजी महाराजांनीं किल्ल्यावर यावें म्हणून बोलावणें केलें, तेंही त्यानें मान्य केलें. प्रतापगडावर शिवाजीचे भेटीस जाण्यास निघते वेळीं त्यानें बरोबर १५०० फौज घेतली होती व एक सय्यद हत्यारबंद शिपाई घेतला होता. काय प्रसंग येईल याचा नेम नाहीं अशी शिवाजी महाराजांच्याही मनांत मोठी धास्ती वाटून त्यांनीं स्वरक्षणासाठीं भेटीच्या ठिकाणाजवळ गुप्तपणें थोडें सैन्य ठेविलें आणि स्वतः स्नान करून नित्य नियम उरकून आपली मातुःश्री जिजाबाई इच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला; अंगांत चिलखत चढवून व त्यावर आंगरखा घालून, उजव्या अस्तनींत एक बिचवा गुप्त ठेविला, व डाव्या हातांत वाघनखे घालून स्वारी खानाच्या भेटीस निघाली. खाशाबरोबर फक्त त्याचा बाळमित्र सरदार तानाजी मालुसरे हा होता. ( मालुसरे गांव