पान:महाबळेश्वर.djvu/307

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७२ )

 सूर्यास्ताचे वेळीं कोंकणपट्टीकडे नजर फेकिली असतां, समुद्राचा किनारा फार रमणीय दिसतो. प्रतापगडावर शिवाजीमहाराजांच्या वेळेपासून मराठ्यांची बखर आहे. किल्याचें पठार अर्धंमैल लांब आहे. अफजुलखानाबरोबर जो इतिहासप्रसिद्ध प्रसंग झाला त्याचं थोडी हकीकत येणेंप्रमाणें आहे:-

 प्रतापगडची लढाई.  शिवाजी महाराजांचें प्राबल्य फारच वाढत चाललें असें पाहून विजापुरचे बादशहा यांनीं त्याचें शासन करण्याचा निश्चय केला व या कामीं आफजुलखान नामें एका नामांकित सरदाराची योजना केली, आणि त्यास बऱ्याच सैन्यासह शिवाजी महाराजांस जेर करण्यास पाठविलें. यावळीं शिवाजी महाराज प्रतापगडींच होते. पुढें आफजुलखान वांंईसं आला हे वर्तमान महाराजांस कळतांच त्यांनीं त्याजकडे वकील पाठवून गरीबीचें बोलणें लाविलें. त्यांत कांहीं बेआदबीचे शब्द वापरल्यामुळे खानाच्या अंतर्यामी राग येऊन शिवाजीचा घात करण्याचा