पान:महाबळेश्वर.djvu/306

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७१ )

  पुढें आपले ताब्यांत असलेले मुलखापैकीं जवळ पासची १ हरोसी, २ कुमठे, ३ बिरमणी ४ हातलोट, ५ माचूतर, ६ बिरवाडी, ७ करंबे, ८ गौडी, ९. केळघर, १० कुचुंबी, ११ डांगरेघर, १२ कऱ्हार, १३ कावडी व १४ जावली या गांवचे ५००० रुपयांचें उत्पन्न करून दिलें. हें उत्पन्न हल्लींं चौथाई वगेरे जाऊन ४००० रुपयाचें देवीकडे दयाळु इंग्रजसरकारांनीं चालविले आहे. याची व्यवस्था पंचामार्फत चालू आहे. त्यांतून देवीचा नंदादीप, नवरात्र उत्सव, रोजचा अन्नसत्र व नोकरांचा पगार वगैरेंचा खर्च होतो. देवीचे देवळापुढें एक लहानसा तलाव आहे, त्यांत पाणी चांगलें असून विपुल असतें. याशिवाय दुसरा तलाव आहे. पुजारी, पुराणिक, चौघडा वाजविणारे गुरव इत्यादिक गडावर राहून नित्य सेवाचाकरी करीत असतात. व यांच्याच वस्तीचीं सुमारें ८|१० घरं वरच आहेत. याशिवाय येथे वस्ती नाहीं, याचे पश्चिम आणि उत्तर बाजूला अस्मान कडे तुटलेले आहेत, यांची खोली ७००| ८०० फूट आहे. अशा ठिकाणीं उभे राहून