पान:महाबळेश्वर.djvu/303

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६८ )

 खोड मोडली, व इतिहासांत आपलें नांव चिरायु करून सोडिलें, त्या मावळ्यांस पोटाची वीतभर खळी भरण्यासाठीं मडमांस, पारशिणींंस, साहेबांस आणि रावसाहेबांस खुर्च्यांत घालून खांद्यावर वहावें लागत आहे, यावरून दैवाची गति मोठी विचित्र आहे. या प्रामाणिक, कृश, व गरीब लोकांकडे पाहिल्याबरोबर पोटांत असा विचार उभा राहतो. डोंगरांतील वाटेला दुतर्फा झाडांची झालर आहे त्यामुळे भोंवतालचा वारा लागून रस्ता तुडवीत जाणारांस फारसा शीण होत नाहीं. वर गेलेवर तटाबाहेर एका लहानशा टेकडीवर थडग्यासारखी एक इमारत आहे. तींत विजापूरचे बादशाहाचा आफजुलखान सरदार शिवाजीमहाराजांबरोबर लढण्यास आला असतां, त्यास मारून त्याचें डोकें पुरलें आहे असें सर्व लोक सांगतात. पुढें आंत जाऊन गडाचे तटावर उभे राहिलें असतां एकीकडे महाबळेश्वरच्या डोंगराची आणि दुसरीकडे कोंकण घांटमाथ्यापर्यंत पसरलेल्या विस्तृत मावळप्रांताची विलक्षण शोभा दिसते. खुद्द किल्ल्याचें टिकाऊ