पान:महाबळेश्वर.djvu/302

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६७ )

 व तो वीरश्रेष्ठ, त्याचें युद्धकौशल्य आणि प्रजावात्सल्य स्वप्नवत् झालेलें पाहून जणूं काय शोकावस्थेनें दिवसेंदिवस खचतच चालला आहेसा वाटतो.

 मालकमपेठेच्या बाजूनें त्यावर जाण्यास रस्ता फार राजमान्य आहे. तो मुंबईपाईंंटाचे खालून फिटझरल्डघाटानें अगदीं वाडयापर्यत जाणारा उत्तम गाडीरस्ता आहे. या रस्त्यानें गेलें ह्मणजे एका तासांत वाडागांव येते, तेथें गेल्यावर आराम पाहिजे असल्यास रहदारी बंगल्यांत किंवा दुसरीकडे गांवांत जावें. आणि थोडा विसावा खाऊन मग गडावर चडण्यास कंबर बांधावी. पायाने जाण्याचें अवसान असल्यास एका पाऊण तासांत वर दरवाज्यापाशीं माणूस जाऊन थडकते; परंतु तसें जाण्याला ज्याला नेट नसेल त्याला खुर्चीत बसून जाण्याची सोय होते. फक्त तेथील मावळ्यांच्या पोटाला दोन अडीच रुपये देण्याचा उदारपणा केला ह्मणजे झालें. शिवाजीच्या हाताखालीं ज्या अडाणी लोकांनीं तोंडांत बोटे घालण्यासारखे जिवावरचे धाडसाचे पराक्रम करून मुसलमानांची