Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/304

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६९ )


व मजबूत बांधकाम पाहून जुन्या लोकांनी हीं एवढाली अवाढव्य कृत्येंं यंत्राच्या साह्यावांचून शरीरकष्टाने कशी केली असावी, याचा चमत्कार वाटतो. आणि ज्यांच्या पूर्वजांनींं टोलेजंग किल्ले बांधिले त्यांच्या वंशजांत मर्दुमकी अशी मुळीच राहिली नाही हेंं पाहून पराकाष्ठेचा विस्मय होतो. डावे बाजूचे रस्त्याने आंत गेले म्हणजे पूर्वेच्या सखल बाजूस भवानीचेंं देऊळ दृष्टीस पडतेंं. या देवालयाचे काम काळ्या दगडाचेंं आहे. सभामंडप मात्र लांकडी आहे. तो ५० फूट लांब, ३० फूट रुंद व १२ फूट उंच आहे. सभामंडपाच्या पिंजरीस वरून तांब्याचा पत्रा सातारचे प्रतापसिंह महाराजांनींं मारलेला आहे. गाभाऱ्यांत काळे पाषाणाची भवानीची शाळुंंकामूर्ति स्थापन केलेली आहे. ती सुमारे १।। फूट उंच आहे. तिच्या अंगावरील वस्त्रालंकार अगदींं पाहण्यासारखे असून मौल्यवान आहेत. सूर्योदय झाल्यानंतर आरशानेंं हिचे तोंडावर किरण पाडून तेंं पाहिले असतां मूर्ति स्पष्ट दिसून तोंडावरील चक