पान:महाबळेश्वर.djvu/301

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६६ )

 पंत पिंगळे पेशवे अथवा मुख्यप्रधान यांचे देखरेखी खाली सन १६५६ सालीं पुरें झालें. याला चोहोबाजूंस तट आहेत ते दुहेरी आहेत. त्यांपैकीं बहुतेक ठिकाणीं किल्लयाच्या कडेला स्वाभाविक काताळ खडक अगदीं तटासारखा उभा आहे, व ज्या ठिकाणींं असा खडक नाहीं त्या ठिकाणींं जंग्या राखलेले बुरूज जागजागी असलेला तट काळे दगडांनीं बांधून काढलेला आहे. परंतु हल्ली तटाचें काम बहुतेक ठिकाणी नादुरस्त होत चाललेलें पाहून मनांत येतें कीं ज्या विख्यात छत्रपति शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून बरेच दिवस महान् महान् पराक्रम करून ज्याने स्वदेशसेवा उत्तम प्रकारे बजाविली आणि आपल्या नांवाचा डंका वाजवून सोडला, तो हा प्रचंड परंतु आतां अगदीं दीन दिसणारा किल्ला आपल्या उतारवयामध्यें त्या शिवाजीमहाराजांच्या वेळचे आपले भरभराटीचे दिवस, व आपल्याला बक्षिस ह्मणून दिलेली " प्रतापगड ” नांवाची पदवी व प्राकारादि अलंकारभूषणें मिळण्याचे निरनिराळे प्रसंग, आठवून