पान:महाबळेश्वर.djvu/284

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४९ )

 नाहीं. व कोठे कोठे बंगल्यांत विहिरीही काढलेल्या असतात.

 बंगला लहान किवा गैरसोईचा असल्यास आणखी नजीकच चालचलाऊ गवती छपरे करून घ्यावीं लागतात. येथें हाटेलांतून उतारूंची गर्दी होऊन गेली म्हणजे असले गवती तंबु लोक राहण्यास नेहमीं करितात. हल्लींंच्या पत्र्यांच्या घरांना व बंगल्यांनासुद्धां पूर्वी असेंच गवती आच्छादन असे. परंतु त्याची जळून खाक होण्याची किंवा वावटळानें वावडी उडण्याची फार धास्ती करीत बसूनही पुन्हां तें दर दोन वर्षानीं पावसानें कुजलेमुळें जुनें काढून नवें करावें लागेच; या सर्व कारणांमुळे आतां जिकडे तिकडे पत्र्याच्या इमारती झालेल्या दिसतात, तथापि पूर्वीचा नमुनाही कोठे कोठे नजरेस येतो.

 या पुढील लिस्टाचा अनुक्रम सरकारी बंगला ( गव्हरमेंट हौस ) येथें असलेल्या सर्व बंगल्यांत अप्रतीम असल्यामुळे मूळारंभीं धरून एकंदरीचीं यादी केली आहे.