पान:महाबळेश्वर.djvu/283

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४८ )

 पूर्वीच्या ऋष्याश्रमाची किंवा पर्णकुटिकेची कल्पना मनांत येते. नामदार गव्हरनरसाहेब, डेविड सासून व सर दिनशा पेटिट यांचे बंगले राजकीय आहेत; परंतु अशा घरांची संख्या मोजण्यास हाताचीं बोटे देखील फार आहेत. मध्यम प्रतीच्या गृहस्थास मालकमपेठेत वाण्याउदम्याचीं रिकामीं घरें व दुकाने राहण्यास मिळतात. कित्येक झोंपडया मोकळ्या जागेवरही आहेत. त्यांस मात्र भाडे बेताचें पडतें.

 या पुढें दिलेल्या यादींत दोन्ही ऋतूंचें प्रत्येक बंगल्याचें साधारणपणें पडणारें भाडे दाखवून त्याच्या कंपौडाचें क्षेत्र व त्याचें भुइभाडेही सरासरीने दिलें आहें, तें अशाकरितां कीं यांपैकीं एखादा बंगला खरेदीच घेण्याचे कोणाच्या मनात आलें तर हें पुस्तक संग्रहीं ठेविल्यानें त्यासंबंधी सर्व माहिती त्यास काढीत बसण्याची बहुतेक तसदी पडू नये.

 या सर्व बंगल्यांना तबेले व नोकर राहण्याच्या सोई केलेल्या आहेत यामुळे येथें येऊन राहण्यांत गाडया घोडयाची हयगय होण्याची काळजी पडत