Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/282

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४७ )

 रण मगदूर किती आहे हें आम्ही पुढील कोष्टकांत दिले आहे. या ठिकाणीं भाडे म्हटले म्हणजे आठ दिवस राहिलें तरी सीजनचेंच भाडें दयावें लागतें. कारण घरवाल्यांना वर्षांचे भाडे आठ महिन्यांत वसूल करून घ्यावें लागतें. कदाचित् कोणास वाटेल कीं इतकालें भाडे घेतात त्याअर्थी घरवाल्यांची चैन असेल; परंतु ही समजूत खोटी आहे; कारण, साधारण बंगला बांधण्यास देखील पैसा व श्रम फार लागतात. या दुःखासही घरवाले इतके भीत नाहींत. परंतु पावसाळ्यामध्यें घरें जतन करण्याचें काम फार कठीण असतें. कारण पाऊस फार अवखळ व वादळेंं फार असल्यामुळे घरांचा खुळखुळा होऊन जातो व बांधण्याच्या खर्चापेक्षां डागडुजींतच पुष्कळ पैशाचें नुकसान होतें. इतकेंही असून हे बंगले महालासारखे मोठे विस्तीण किंवा सोईचे असतात असें नाहीं. त्यांना बहुधा " हट " अगर ‘ काटेज ” अशी संज्ञा असते व त्याचप्रमाणें त्यांचें स्वरूप असतें. मुख्य सुख इतकेंच कीं हरएक बंगल्यासभोंवार सुखप्रद, रमणीय आणि गर्द झाडी असते, तेणेंकरून