महाराज होळकर, महाराज गायकवाड, कच्छचे राव, महाराज भावनगर, मिरज, कुरुंदवाड, व अक्कलकोट वगैरे ठिकाणचें सरदार, मारवाड उत्तर हिंदुस्थान वगैरे ठिकाणचे राजे लोक, लिमडीचे संस्थानिक, मोठमोठे जज्ज, वकील, बारिस्टर यांची येथें बरीच गर्दी झाल्यामुळें थोडे दिवस शहराची रोषनाई येऊन अगदीं जणूं कांहीं घटोत्कचाचा बाजारच बनून जातॊ.
महाबळेश्वरीं येण्यांत खर्चाची मुख्य रक्कम ह्मटली म्हणजे घरभाडे होय. मोठमोठया साहेब व इतर बडे लोकांचे बंगले मालकमपेठेच्या वस्तीपासून दूर आहेत. त्यांपैकीं कांहीं बंगल्यांत मात्र मालकाखेरीज कोणी लोक भाडयानें राहत नाहींत. त्यांस पुढील यादींत आदमासिक भाड़े सांगितलें नाहीं. ज्यांचे भाडें दाखल केलें आहे तेसुद्धां त्यांच्या मालकांस नकोसें असतील तेव्हांच दुसऱ्यास मिळतात. अशा भाडयानें मिळणाऱ्या एकेका बंगल्याचें भाडें हिवाळ्याकरिता व उन्हाळ्याकरितां निरनिराळे ठरवावें किंवा दोही ऋतूंचें एकदम ठरवावे. त्याचा साधा