पान:महाबळेश्वर.djvu/280

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४५ )

 णारे असतांही त्यांनीं व आमचे मुंबई सरकार यांनीं येथें हजारोंच्या हजारों रुपयांचा खर्च करून या भयंकर जंगलांत वसाहात करून टाकिली आहे. असा हा लांब लांब ठिकाणच्या श्रीमान लोकांच्या मनावर जो परिणाम घडला तो वस्तुस्थिति तदनुरूप असल्याशिवाय घडणार नाहीं हें आतां कोणीही कबूल करील.

 या बांधलेल्या इमारतींत मालकांस प्रतिवर्षीच्या थंड व उष्ण काळांत जरी राहण्यास झालें नाहीं तरी त्यांच्या इमारती भाडयाने देण्याची त्यांची खुषी असल्यास त्या रिकाम्या राहत नाहींत एवढेंच नाहीं, परंतु त्यांचें चांगलेंच रेलचेल भाडे मालकास मिळतें. हें पुढील लिस्टावरून दिसेल. या प्रमाणें येथील बंगले, घरें, खोपटें इतर जमीनजुमल्याप्रमाणेंच उत्पन्नाच्याबाबीं झाल्या आहेत. अशा हवापाण्याचे सौख्योपभोगाकरितां दरसाल शेकडों रुपयांचा येथें येण्यानें चुराडा झाला तरी याची कांहीं फिकीर वाटत नाहीं. असें समजूनच बडेबडे साहेब लोक, महाराज छत्रपति कोल्हापूर,