पान:महाबळेश्वर.djvu/279

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



बंगले.
----------

 या महाबळेश्वरच्या हवापाण्याची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे यांत कांहींच संशय नाही; हें केवळ आम्हीच म्हणतों असें नाहीं. परंतु याची सत्यता श्रीमान युरोपियन व नेटिव कामगार व - विद्वान डाक्तर लोकांच्या चिकित्सेनें चांगल्या आरोग्य वर्धनीय ठरलेल्या हवेचा अनुभव घेतलेले इतर सधन लोक यांच्या कृतीवरूनही उघड दिसत आहे. कारण या सानिटेरियमच्या सुखकर जागेवर येऊन राहण्याचे सोयीसाठीं कसलें तरी बरें वाईट, "हट किंवा काटेज” नवीन बांधून ठेवण्याचा किंवा पूर्वी बांधलेले असेल तें या ठिकाणच्या अतिवृष्टीपासून सुरक्षित राखण्याचा क्रम फार दिवसापासून चालला आहे. त्याचें पाऊल दिवसेंदिवस पुढेंच पडत आहे. यांचे मालक कोणी विलायतचे, कोणी मुंबई, पुणेंं; इंदूर; मिरज, जमखिंंडी, असे दूरचे प्रदेशांतील राह-