पान:महाबळेश्वर.djvu/277

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४२ )

 केलें, पाण्याची एखादी चूळ भरून टाकली, पानसुपारीचा एखादा बार भरला, किंवा चिलमीचे ( साध्या चिलमीचे ) व विडीचे चार दोन झुरके घेतले, कीं पुनः आपले पहिल्यासारखे हुशार ! कांहीं खाल्ले तरी साफ पचावयाचें- आणि कितीही खाल्ले तरी आधिकच खावेंसें वाटावयाचें अशी जेथील हवा, अशा ठिकाणीं जागेच्या अडचणीपासून होणाऱ्या त्रासाकडे कोणी फारसें लक्ष्य देत नाहीं. या कारणास्तव महाबळेश्वरीं जाण्याचें जरी फुकाचें नाहीं तरी ज्यांना नोकरीचा धोशा पाठीमागें नाहीं असे लोकही येथें येतात. परंतु त्यांची संख्या फार थोडी असते, व पैसा खर्च केल्याचें पूर्ण फळ त्यांना मिळतें, इतकेंच नाहीं तर द्विगुणितही मिळतें.

 अशी जागेची चणचण आहे तर मुंबईचे किंवा पुण्याचे सावकार लहान लहान घरें किंवा चाळी येथें येणाऱ्या कोणा सामान्य स्थितीच्या लोकांकरितां कां बांधून ठेवित नाहींत, अशी कोणी शंका घेईल; पण पैसेवाले लोक आपल्या रकमा येथे चाळींत वगैरे गुंतवून ठेवण्यास कां धजत नाहींत याचें