पान:महाबळेश्वर.djvu/276

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४१ )


त्यांजवर आंकडा घालून लागलींच धर्मखात्याचा पैसा त्याप्रमाणें देऊन टाकितात.

 तात्पर्य, जाग्याचे इतके हाल सोसून देखील येथें महिना दीड महिना काढणें फायदेशीर आहे. ज्या प्रमाणें तरूण स्त्रीला सासुसासऱ्याचा, नणंदाजावांचा किंवा दुसऱ्या कोणाचा कितीही जाच असला तरी जर तीवर नवऱ्याचें पूर्ण प्रेम असेल, तर त्याची तिला फिकीर वाटत नाही; उलट माहेरापेक्षांही सासरच अधिक सुखावह वाटतें. त्याप्रमाणें अवांतर गोष्टींपासून कितीही त्रास झाला तरी एका हवेच्या सुंदरपणामुळे बाकीच्या सर्व संकटांअडचणींची कोणास कांहीं दिक्कत वाटत नाहीं.

 येथील सुखाची काय प्रौढी वर्णावी? बर्फ न घालतां गार व गोड पाणी; कोठेही पडलें तरी गार व स्वच्छ हवा; गोठ्यांत पडा कीं पडवींत पडा, जमिनीस आंग लागल्याबरोबर निद्रेची मेिठी, अतिशय भिकार जागेंत देखील एक ढेकूण, डांस किंवा पिसू दिसण्याची मारामार; कितीही श्रम झालें तरी सदरा कादून टाकून जरासें हुश्श हुश्श