जाईल असें आम्हास वाटतें ! अशा अडचणीमुळे स्वयंपाक करण्यास ज्यांस फार ताप होत असेल किंवा भांडींकुंडीं व शिधासामुग्री यांची जुळवाजुळव करण्यास कपाळास पित्त येत असेल त्याला येथें ब्राह्मणाच्या एका व शुद्राच्या बऱ्याचशा खाणावळींत स्वस्थ बसून जठराग्नी शमन करण्याची सोय आहे. त्याबद्दल ब्राह्मणाचे खाणावळींस दरमाहा रुपये ८ पासून १० पर्यंत व शूद्रांच्या खाणावळींत कमी प्रतीचे खाणें खाल्ल्यास दरमाहा रु० ९ पर्यंत आकार पडतो.
कोणी एकादा गरीब मनुष्य येथें येऊन आपली झोळी सजवीन म्हणेल तर तेवढी मात्र सोय नाहीं. कारण येथें कोणत्याही जातीचें एकसुद्धां भिकार कोठेही दृष्टीस पडत नाही. परंतु जर कदाचित् कोठे दृष्टीस पडलें तर त्यास पोलिस धरून हाकून लावितात. येथें गरीब भिकारी लोकांकरितां एक फंडाची रकम वर्गणी करून जमविलेली आहे, त्यांतून त्यांस पैसा वाटितात. हा पट्टी जमविण्याकरितां वर्गणीचें बूक सर्वांकडे घेऊन जाऊन त्यांच्या मजींप्रमाणे