पान:महाबळेश्वर.djvu/274

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३९ )

 आपल्या मालकाच्या बंगल्यांत कोठे तरी पडून राहतात.

 पण साहेब लोकांच्या हपिसांतील नोकरांची फार त्रेधा उडून जाते ? सरकारांतून कितीही मोठे भाडे मिळालें तरी तेवढ्यानें उन्हाळ्यांत येथें राहण्यास चांगलें घर मिळत नाहीं. महिन्या दीड महिन्यासाठी, पंचवीस तीस किंवा चाळीस रुपये देऊन कोणाला एखाद्या वाण्याच्या अंधाऱ्या भाजघरांत, कोणाला एखाद्या ब्राम्हणाच्या धुरकट स्वयंपाक घरांत, कोणाला एखाद्या कुणबटाच्या खोपटयांत गुजारा करावा लागतो! तसेच येथे पाण्याचीही मोठी सक्त मेहनत आहे. पाणी लांब असून खोल असल्यामुळे विहिरींतून एक घागर किंवा हंडा वर काढून घरीं आणून टाकी तोंपर्यंत हातापायास आणि पाठीच्या कण्यास चांगलाच व्यायाम होऊन जातो ! कोणी विशेष वातबद्ध स्त्री असेल तर तिच्याकडून येथील विहिरीच्या दहा बारा घागरी रोज आणावाव्या, ह्यणजे एका पंधरवड्यांत तिचा बहुतेक वात झडून