पान:महाबळेश्वर.djvu/273

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३८ )

 पोरें व इतर नातलग पोसावयाचे असल्यामुळे सदोदित हातातोंडाशी गांठ असते. तेव्हां येथें येऊन राहण्यास अद्वातद्वा खर्च कोठून करणार! शिवाय परतंत्रता विघ्नसंतोषीपणा करण्यास तर एका पायावरच तयार असते. आतां जे लोक धंदाउदयोग, शेतकी वगैरे करून दोन पैसे मिळवितात, व संचय करितात त्यांना ऐपत असते. परंतु त्यांना येथें जाण्यापासूनचे फायदे कळत नाहींत. सारांश महाबळेश्वर आपलें असून तेथील सुख आपलें दैवीं नाहीं. पण गरीब लोकांनीं असें म्हणून पोटांत काय घालावयाचें आहे ? यांच्या खेरीज अंमलदारांचा आणि श्रीमंत लोकांचा निभाव कसा लागावा ? साहेबाला शिरस्तेदार पाहिजे, कारकून पाहिजेत, पटेवाले पाहिजेत. सारांश, बहुतेक त्यांचें हापिस पाहिजे. संस्थानिकांना त्यांचे कारभारी, त्यांचे शिक्षक, त्यांचे कारकून, त्यांचे चारदोन स्नेही, हुजरे, पाणके, आचारी, वगैरे लोक पाहिजेत. या लोकांची मात्र व्यवस्था नीट रीतीनें लागत नाहीं. संस्थानिकांच्या आश्रितांची स्थिति थोडी बरी असते. कारण, हे