पान:महाबळेश्वर.djvu/272

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३७ )

 ताच्या झाडीचा चमत्कार व जिमखान्यांतलि खेळांची धुमश्चर्की पाहण्यास छानदार सांपडतें. ह्या तिन्ही ठिकाणीं रोजचा आकार ४ रु० पासून ७ रु. पर्यंत मिजासीचे मानानें द्यावा लागतो.

 यहुदी आणि पारशी लोकांच्याकरितां येथें विश्रामालये आहेत तीं- रे व्हिला, रायल फॅमिली व महाबळेश्वर क्लब. या संस्थांच्या व्यवस्थितपणाचा अनुभव घेतलेल्या एका प्रवाशानें असें लिहून ठेविलें आहें कीं जे कोणी लोक यास उदार आश्रय देतात त्यांस त्यांचे चालक चांगली बरदास्त ठेवून खूष करितील. या विश्रामालयांत येऊ इच्छिणाऱ्या प्रवासी जनांनी त्यांचे चालकांस त्याप्रमाणें सूचना मात्र आगाऊ लिहून दिली पाहिजे.

 महाबळेश्वरीं सर्व कांहीं चांगलें आहे पण एक मात्र चांगलें नाहीं;तें काय म्हणाल, तर राहण्याची सोय. पण ही गोष्ट अंमलवाल्या, पैसेवाल्या इंग्रज लोकांस आणि फक्त पैसेवाल्या हिंदु, पारशी व मुसलमान लोकांस लागं नाही. पंचाईत पडते ती कायती गरीब लोकांची ! अगोदर भीक, त्यांतून रोजगार मिळाला तर बायका