पान:महाबळेश्वर.djvu/271

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हॉटेलें. ( HOTELS)
------------


 महाबळेश्वरक्लबाखेरीज येथे युरोपियन किंवा पारशी लोकाकरितां तीन हॉटेले ( खाण्याराहण्याची सोय असलेल्या संस्था ) आहेत. (१) रिपन हाटेल येथील तार आफिसालगत आहे. त्यांत राहण्याची जागा, फर्निचर वगेरे उत्तम प्रकारचे असून सभोवारची झाडी सूर्याच्या प्रखर तेजाचा तर मुळीच आंत शिरकाव होऊ देत नाही. यामुळे ही हाटेल फारच सुखकर झाली आहे. तसेच ही हाटेल अगदी मध्य वस्तीत असून फ्रिअर हाल, जिमखाना, पोस्ट व तारआफिस याच्या निकट आहे. (२) फाउंटन हाटेल दक्षिण बाजूस सासून पाइंटाच्या रस्त्यावर आहे. ह्या हाटेलला फार रमणीय ह्यू आहे. ( ३ ) हाटेल पूर्व भागास या शैलशिखराच्या शेंवटास रेसव्ह्यू नांवाच्या इमारतींत आहे. येथून वेण्णा सरोवराचा व त्याच्या आसमं-