हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३५ )
टोलेजंग इमारत आहे. तेथून नजीक दवाखाना आहे. पूर्वबाजूस पेठेंत अमेरिकनचर्च आहे; व त्याचे मागील अंगास मराठी शिकण्याची रे स्कूलची इमारत आहे. येथें एक धर्मशाळा चांगली बांधलेली आहे. नजीक फॉरेस्ट आफिसची सरकारी इमारत आहे. रे स्कूलच्या मागील अंगास सार्वजनिक पायखाने असून खाटीक लोकांना गुरें, बकरी कापण्याची जागा केलेली आहे. व येथेच महार व मांग लोकांच्या झोंपडया आहेत. या मैदानाला बॉनी व्हू असें नांव आहे. ही घाण या मैदानांतून काढून दुसरीकडे नेली ह्मणजे सॅॅडल बॅककडे तोंड करून घरे बांधण्यास फार चांगली जागा आहे.
प्रत्येक महिन्याचे पहिले तारखेस बाजारभावाची निरखपट्टी चावडीवर व फ्रिअरहालमध्यें लावितात. परंतु त्यांतील दराप्रमाणें विकण्यास कोणी बांधले जात नाहींत. तथापि त्यांत विशेष फरक होत नाहीं.
--------------