पान:महाबळेश्वर.djvu/269

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३४ )

  लांकूड फाटी व कोळसा येथे स्वस्त मिळतो, तो धावड कुणबी लोक जंगलांतून आणून विकतात. येथें गवत विकावयास पुष्कळ येतें, व तितकें सर्व खपून लागलींच लोक परत घरी जातात. बटाटे, मध व मेण या मालाची येथें उतारपेठ आहे. कोळी लोक जंगलांतील हजारों रुपयांचा मध आणून बाजारांत विकतात. तसेच इमारतीचें जंगली कांपीव लांकूडही बाजारांत आड्डयावर विकावयास बरेंच येतें. कोंकणे तांदुळ, देशी तांदुळ वगेरे धान्यही येतें. कडबा, कोळंब, तावीट, कारवी, सागाचीं पानें, सापडया, वासे वगैरे माल सकाळीं विक्रीस येतों.

 मार्च महिन्यापासून येथें लोक येण्यास सुरुवात होते, तेव्हां दिल्ली वगैरेकडील जवाहीर विकणारे, काश्मीरकडील लोकरी कपडे विकणारे, दिल्ली आग्र्याकडील सतरंज्या विकणारे, फळफळावळ विकणारे यांची येथें गर्दी होऊन जाऊन बंगलोंबंगलीँ विक्री करण्याकरितां ते फिरत असतात.

 पेठेत पश्चिम अंगांस रोमन कॅथलिक चर्च आहे, व त्याच्या पलीकडे नवीन बांधलेली लायब्ररीची