Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/266

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३१)

 मराठे, धनगर, कुणबी- येथेंं मराठे धनगरलोक गाई ह्मशी आणि शेरड्या बाळगून दूध व लोणी यांचा व्यापार करितात, हेंं वर सांगितलेच आहे. शिवाय सीझनमध्येंं वांईचे गवळीलोक आपली दुभती जनावरे घेऊन येऊन येथे राहतात. जवळपासच्या खेड्यांतील लोकहीं लोणी सांठवून येथे विक्रीस आणतात. येथे डेरी ( लोणीखाना ) नाही. पांचगणी येथील डेरीचे व मुंबईचे लोणी येथे विक्रीस येते, ते पारशी व साहेबलोक मात्र घेतात.

 मारवाडी-कापडाचा व भुसार माल ( बाजरी, जोंधळे, तांदुळ, दाळ, मीठ.) वगैरेंचा व्यापार करितात.

 शिंपी-शिंप्यांची दुकाने येथे बरीच आहेत. काहीं कापडाचा व्यापार करून शिवण्याचाही धंदा करितात. काही नुसते शिलाईचेंं काम करणारे आहेत. पावसाळ्यांत काम नसलेमुळे बहुतेक निघून जातात.

 वाणी, पंचमवाणी, तिराळे, गुजर व कोमटी- यांची किरकोळीने वाणजिन्नस व भुसार माल विकण्याची दुकानेंं आहेत. तेथे सर्व प्रकारचे धान्य, गोडेंं तेल, खो-