पान:महाबळेश्वर.djvu/267

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३२ )

 बरेल, तूप, स्टेशनरी, वगैरे सामान मिळतें. बाजरीचें पीठ, मैदा, रवा, वगैरेही मिळतात.

 रोटीवाले- येथें रोटी चांगली मिळते, परंतु ती २० वर्षांपूर्वी मिळत होती तशी मिळत नाहीं, याचे कारण असें सांगतात कीं, ताडीवर जकात फार बसल्यामुळे ताडी येथें आणण्याचें परवडत नाही. ह्मणून बटाटे व दुसऱ्या वनस्पतींच्या दारूचा यांत उपयोग करावा लागत असल्यामुळे ताडीनें होत होत्या तशा रोटया हल्ली उत्तम होत नाहीत.

 बोहरी व मेमन- यांच्या दुकानांत कांचेचे दिवे, त्यावरील चिमण्या, चिनी बशा पेले, स्क्रू, खिळे वगैरे व दुसरें पुष्कळ नकली सामान असून तूप, मेण मुंबईस, पाठविणें वगैरेचाही हे व्यापार करितात.

 धावड- हे मजुरीची कामें, गवंडी काम , शेतकी व बागाईताचें काम करितात, व जंगलातून निरनिराळ्या प्रकारच्या काठ्या आणून विकतात, व कोणी हेलकऱ्याचीही कामें करितात.