पान:महाबळेश्वर.djvu/265

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३० )

 पारशेी-मेल कंत्राटदार व इतर लोकांस टांगे, फैटणी भाडयानें देणें, युरोपस्थ लोकांस लागणारे दारु वगैरे पदार्थ, आगाऊ सूचना दिली म्हणजे फिश आणून देणें, बर्फ, सोडावाटर वगैरेचीं दुकानें या लोकांचीं आहेत.

 मुसलमान --यांची चावडीनजिक म्युनिसिपालिटीनें बांधलेलीं भाजीपाला व फळफळावळीचीं दुकाने आहेत. त्यांत हंगामाचे दिवसांत बटाटे, कोबी, फुलावर, नवलकोल, बीट, वाटाणे, या इंग्रजी भाज्या; कांदे,लसूण व इतर सर्व एतद्देशीय फळभाज्या व पालेभाज्या; स्ट्राबेरी, राजबेरी, गूजबेरी हीं इंग्रजी फळे; नागपूर कडील फळे; वसईची लाल केळींं; रत्नागिरी व गोमांतकचे हापूस पायरीचे आंबे; पुण्याकडील संत्रे, सफरचंद, अंजीर, द्राक्षे, चकोत्री, पेरू, आननस, सोनकेळीं, करवंदे, जांबळे, लिंंबें, आलें, तोरणें, अंबोळकी वगैरे एद्देशीय फळे कालमानाप्रमाणें मिळतात. इंग्रजी फळे व भाज्यांखेरीज सर्व माल वांई, सातारा वगैरेकडील असतो. इंग्रजी तऱ्हेचा माल मात्र येथें करितात.