पान:महाबळेश्वर.djvu/264

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२९ )

 पेठेचे मध्यभागीं सर्व दुकानें आहेत, या भागालाच मुख्यतः मालकमपेठ असें म्हणतात. दुकानाच्या मागील दारी या दुकानदाराची कुटुंबें राहतात.

ब्राह्मण मराठे वाणीपंचम
पारशी मुसलमान(काजी) धावड
धनगर कोमटी मारवाडी
गुजर जैन मारवाडी शिंपी
रोटीवाले भोरी मुसलमान
मेमन मुसलमान चांभार बुरुड

इत्यादिकांची वस्ती आहे. यांपैकीं बहुतेक जातीच्या लोकांचीं दुकानें आहेत. त्यांत सर्व प्रकाचा माल मिळतो. परंतु तो सातारा वांईकडून येत असल्यामुळे महाग विकतो.

 कोणते जातीचे लोक काय व्यापार करितात तें खाली देतों:-

 ब्राह्मणलोक-सराफी, अडाणी लोकांचीं पत्रे वगैरे लिहिणेंं आणि देवघेवीचे व गाहणापाणाचे व्यापार हे धंदे मुख्यत्वें करून करितात. त्यांचीं दुकानें आहेत.