Jump to content

पान:महाबळेश्वर.djvu/263

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२८ )

 सर्व सणाला हिंदूंप्रमाणें खाणें ठेऊन पोशाख नेहमींपेक्षां ते चांगला करितात. ही जात फार दारुबाज आहे.

------------
बाजार.

येथील बाजार अगदीं भरवस्तींत आहे. बाजार बसला आहे त्या जागेला डोंगराचा उतार ( slope) आहे, परंतु त्यांत टपे टपे ठेऊन थोडथोडी सपाट जमीन काढली आहे आणि त्यांत दुकानें घातलीं आहेत. लांबून ख्रिस्ती देवळाची उंच इमारत दिसते, त्याचे दक्षिणेस हा बाजार आहे. या मालकमपेठच्या वस्तीला, पूर्वपश्चिम दुतर्फा घरें असलेल्या तीन सडका आहेत. यांपैकीं दोन सडकाच्या बाजूंनीं दुकानें बांधलेलीं असून नेहमीं त्यांत वस्ती असते. ख्रिस्ती देवळालगतच्या बाजूला सुमारें ४|५ घरे आहेत. येथें राहणारे सर्व लोक व्यापारी व नौकर आहेत. येथें इनामदार किंवा भिक्षुकी करून सुखवस्तु राहणारे लोक नाहींत. या बाजारानें २३ एकर १,०७० यार्ड जागा भरून काढली आहे.